बोथबोडन येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांचा भारत बंदला समर्थन | Yawatmal | Farmer | Sakal

2021-04-28 1,053

यवतमाळ : जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या बोथबोडन या गावांमध्ये झाल्या आहे. राज्य व केंद्र सरकारने अनेक योजना शेतकऱ्यांसाठी लागू केल्या. मात्र, त्याचा कुठलाच फायदा या शेतकऱ्यांना झाला नाही. त्यामुळे या गावात आतापर्यंत २९ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याने पुन्हा देशोधडीला लागणार आहे. या कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. यात आपलाही खारीचा वाटा असावा यासाठी येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांनी ठिय्या आंदोलन करून दिल्लीच्या  आंदोलनाला समर्थन दिले आहे. बोथबोडन येथील शेतकरी विधवांनी पारंपरिक बंजारा लोकगीत म्हणून भारत बंदला पाठींबा दिला. (व्हिडिओ - सूरज पाटील)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires